Charkop

charkop cha Parmeshwar 2026 sector 3 charkop kandivali west 400067

Charkopcha Parmeshwar

प्रति वर्षीप्रमाणे उपरोक्त मंडळाच्या वतीने मिती माघ शुद्ध चतुर्थी, फाल्गुन शके १९४७, गुरुवार दिनांक २२ जानेवारी २०२६ ते सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ या कालावधीत “माघी गणेशोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

या वर्षी मंडळाच्या वतीने चर्कोप परिसरातील एकमेव टिश्यू पेपरपासून साकारलेली, संतुलित (Balancing) गणेशमूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी स्थापित करण्यात येत आहे. ही गणेशमूर्ती ३६० अंशात फिरणारी (360° Rotation) असून तिची उंची तब्बल २२ फूट आहे, ही या उत्सवाची खास वैशिष्ट्ये आहेत.

या निमित्ताने मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा व उत्सवाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.

charkop cha Parmeshwar 2026 sector 3 charkop kandivali west 400067 maghi ganpati

कार्यक्रम रुपरेषा

गुरुवार २२ जानेवारी २०२६

श्रीं ची स्थापना

शुक्रवार २३ जानेवारी २०२६

आरोग्य शिबीर व भजन

शनिवार २४ जानेवारी २०२६

संध्याकाळी ५ ते ६ वा. हळदी कुंकु 

रविवार २५ जानेवारी २०२६

 सकाळी १०.३० वा. चित्रकला स्पर्धा
व सत्यनारायण महापुजा

सोमवार २६ जानेवारी २०२६

श्रीं चे विसर्जन

🤞 Get all updates of Charkop.in

We don’t spam! Read our privacy policy for more info.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *