प्रतिवर्षीप्रमाणे उपरोक्त मंडळाच्या वतीने मिती माघ शुध्द चतुर्थी फाल्गुन शके १९४६ शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २०२५ ते शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत
“माघी गणेशोत्सव”
साजरा करण्यात येत आहे, मंडळाच्या वतीने सांस्कृतीक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, आपण या कार्यक्रमांस उपस्थित रहावे हेच आग्रहाचे निमंत्रण !
चारकोपचा राजा या मंडळाची स्थापना २००६ मध्ये केलेली असून माघ महिन्याच्या शुभ महिन्यात साजरा केला जाणारा माघी गणेश उत्सव सात दिवसांचा असतो. या उत्सवादरम्यान राजाच्या दिव्य उपस्थितीचे साक्षीदार होण्यासाठी भक्तांची झुंबड उडते, ज्यात भक्त, सामाजिक कार्यकर्ते, नेते आणि सेलिब्रिटी देखील असतात. मंडळ सात दिवसांच्या उत्सवात भजन, कीर्तन आणि इतर आध्यात्मिक कार्यक्रम यासारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करते.
आयोजक उपस्थितांसाठी उत्तम व्यवस्था सुनिश्चित करतात, सुंदर असे व्यवस्थापित स्थळ, उत्कृष्ट सुरक्षा आणि उत्साही वातावरण. माघी गणेश उस्तवाला विशेष महत्त्व आहे कारण ते गणपतीच्या जन्माचे प्रतीक आहे. पहिल्या दिवशी, मोठ्या उत्साहात मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. उत्सवामुळे समितीच्या महिलांमध्ये आनंदाचे व एकतेचे वातावरण निर्माण होते.
•|| चारकोपचा राजा ||•

कार्यक्रम
शनिवार दि. १ फेब्रुवारी २०२५
सकाळी १०.०० वा. – श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
दुपारी १२.०० वा. – गणेश जन्म सोहळा
सायं. ६.३० वा. – भजनाचा कार्यक्रम – गंधस्वरांचे सादरकर्ते – शाहीर रमेश हडपी कलामंच
रविवार दि. २ फेब्रुवारी २०२५
सायं. ६.३० वा. – भजन संध्या सादरकर्ते – साई माउली भजन मंडळ
सोमवार दि. ३ फेब्रुवारी २०२५
सायं. ६.३० वा. – साई भजनमाला – कृपा झाली साईंची
मंगळवार दि. ४ फेब्रुवारी २०२५
सकाळी १०.०० वा. – श्री गणेश याग
सायं. ६.३० वा. – भक्तीगीतांचा कार्यक्रम सादरकर्ते – भक्तगण भक्तिभजन मंडळ
रात्री ८.०० वा. – साईं भजन- भरला साईंचा दरबार- सादरकर्ते – श्री साई आदर्श भजन मंडळ
बुधवार दि. ५ फेब्रुवारी २०२५
सकाळी १०.०० वा. – श्री सत्यनारायण महापूजा अभंग, नाट्यगीत, शास्रीय गीतांची मैफिल
सायं. ६.३० वा. – सादरकर्ते – कु. प्राप्ती व जान्हवी दहिवलकर
गुरुवार दि. ६ फेब्रुवारी २०२५
भजन संध्या – कृपा स्वामींची वाद्यवृंद प्रस्तुत
सायं. ६.३० वा. – (अवघा रंग गणरंग) सादरकर्ते – प्रशांत प्रिंदावणकर व अजय जाधव
शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी २०२५
सकाळी ८.०० वा. – उत्तरपूजा व विसर्जन सोहळा
Ganpati Bappa Morya