प्रति वर्षी प्रमाणे उपरोक्त मंडळाच्या वतीने मिती माघ शुध्द चतुर्थी श्री शालिवाहन
शके १९४४ जयनाम संवत्सर मंगळवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ ते सोमवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत
“माघी गणेशोत्सव”
साजरा करण्यात येत आहे, मंडळाच्या वतीने सांस्कृतीक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, आपण या कार्यक्रमांस उपस्थित रहावे हेच आग्रहाचे निमंत्रण !
चारकोपचा राजा या मंडळाची स्थापना २००६ मध्ये केलेली असून माघ महिन्याच्या शुभ महिन्यात साजरा केला जाणारा माघी गणेश उत्सव सात दिवसांचा असतो. या उत्सवादरम्यान राजाच्या दिव्य उपस्थितीचे साक्षीदार होण्यासाठी भक्तांची झुंबड उडते, ज्यात भक्त, सामाजिक कार्यकर्ते, नेते आणि सेलिब्रिटी देखील असतात. मंडळ सात दिवसांच्या उत्सवात भजन, कीर्तन आणि इतर आध्यात्मिक कार्यक्रम यासारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करते.
आयोजक उपस्थितांसाठी उत्तम व्यवस्था सुनिश्चित करतात, सुंदर असे व्यवस्थापित स्थळ, उत्कृष्ट सुरक्षा आणि उत्साही वातावरण. माघी गणेश उस्तवाला विशेष महत्त्व आहे कारण ते गणपतीच्या जन्माचे प्रतीक आहे. पहिल्या दिवशी, मोठ्या उत्साहात मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. उत्सवामुळे समितीच्या महिलांमध्ये आनंदाचे व एकतेचे वातावरण निर्माण होते.
•|| चारकोपचा राजा ||•
कार्यक्रम
मंगळवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०२४
श्रींच्या मुर्तीची प्रतिष्ठापना – सकाळी १०.०० वा.
गणेश जन्म सोहळा – दुपारी १२.०० वा.
ओंकार हार्ट रॉकर्स डान्स अकॅडमी प्रस्तुत नृत्यांचा बहारदार कार्यक्रम – सायंकाळी ७.०० ते ८.३० वा.
नृत्य दिग्दर्शक: ओंकार शरद चव्हाण
भक्ती गीतांचा कार्यक्रम – रात्री ८.३० वा.
सादरकर्ते: जिवन विद्या मिशन
बुधवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२४
शब्द सुरांच्या गाठी कार्यक्रम – सायंकाळी ७.३० वा. हिंदी मराठी भक्ति गितांचा कार्यक्रम.
सादरकर्ते: (विष्णू नांदिवडेकर) स्वरसाई माऊली कलामंच
गुरुवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२४
स्वर चांदण्यांचे भावगीत व भक्तीगीतांचा कार्यक्रम – सायंकाळी ७.३० वा.
सादरकर्ते: श्री. अजित सक्रे आणि सहकारी
शुक्रवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२४
श्री गणेश याग – सकाळी १०.०० वा.
भजन संध्या – सायंकाळी ७.३० वा.
सादरकर्ते: साई माउली भजन मंडळ
शनिवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२४
श्री सत्यनारायणाची महापुजा – सकाळी १०.०० वा.
साई भजनाचा कार्यक्रम – सायंकाळी ७.३० वा.
सादरकर्ते: साईस्तुती भजन मंडळ, जोगेश्वरी (पु)
रविवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२४
लोककला उत्सव – सायंकाळी ७.३० वा.
सादरकर्ते: शाहीर रमेश हडपी कलामंच
सोमवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२४
उत्तर पूजा व विसर्जन सोहळा – सकाळी ८.०० वा.
Ganpati Bappa Morya