प्रति वर्षी प्रमाणे उपरोक्त मंडळाच्या वतीने मिती माघ शुध्द चतुर्थी फाल्गुन शके १९४6 जयनाम संवत्सर शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २०२५ ते शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत “माघी गणेशोत्सव” साजरा करण्यात येत आहे, मंडळाच्या वतीने सांस्कृतीक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, आपण या कार्यक्रमांस उपस्थित रहावे हेच आग्रहाचे निमंत्रण !
चारकोपचा सम्राट मित्र मंडळ, हे मुंबई उपनगरातील चारकोप विभागातील जुने व मानाचे मंडळ. मंडळाची स्थापना २००८ साली झाली. गेली समांतर १५ वर्षे अविरतपणे चारकोपचा सम्राट आदरणीय राजन भाई झाड यांच्या हस्त कौशल्याने आकार घेत आहे. मंडळ दरवर्षी गणारायांची मुर्ती विविध रूपात सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. गणारायचे ही महाकाय रूप पाहण्यास दरवर्षी संपूर्ण चारकोप गणेश भक्तांनी फुलून जाते, ‘न भूतो ना भविष्यती’ अशी तोबा गर्दी होते .
मंडळातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही माघी गणेशोत्सव मोठा थाटामाटात तसेच पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. त्या दरम्यान श्रीं ची भव्य मिरवणूक, प्राणप्रतिष्ठापना, श्री सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, श्रीं ची विसर्जन मिरवणूक मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात केले जाणार आहे.
उत्सवातून समाजसेवा या तत्वाशी बांधिलकी ठेवत रक्तदान शिबीर, मोफत वैद्यकीय व नेत्र तपासणी शिबीर, गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांना संगणक तसेच शैक्षणिक साहित्य वाटप, उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन शिबीर, महिलांसाठी बचतगट प्रोत्साहन शिबीर असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
त्याकरिता आपण आपला अमूल्य वेळ देऊन मंडळास मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, हि नम्र विनंती.
चारकोपचा सम्राट मंडळाने केलेल्या समाजोपयोगी कार्याची दखल घेत २०१६ मध्ये ‘माघी उत्सवाचा राजा’ २०२२ आणि २०२३ मध्ये ‘संस्कृती जतन प्रतिष्ठान पुरस्कृत लोकमान्य’ सन्मान देऊन गौरविण्यात आले ते फक्त देणगीदार, जाहिरातदार, हितचिंतक आणि कार्यकर्त्यांची प्रामाणिक मेहनत यांच्यामुळेच

कार्यक्रम रुपरेषा
०१ फेब्रुवारी २०२५
श्री ची प्राणप्रतिष्ठापना
०३ फेब्रुवारी २०२५
जागरण आणि गोंधळ
०५ फेब्रुवारी २०२५
सत्यनारायणपूजा, सुस्वर भजन, महा प्रसाद आणि भंडारा
०६ फेब्रुवारी २०२५
सांस्कृतिक कार्यक्रम
०७ फेब्रुवारी २०२५
विसर्जन सोहळा