प्रति वर्षी प्रमाणे उपरोक्त मंडळाच्या वतीने मिती माघ शुध्द चतुर्थी श्री शालिवाहन
शके १९४४ जयनाम संवत्सर मंगळवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ ते सोमवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत “माघी गणेशोत्सव”
साजरा करण्यात येत आहे, मंडळाच्या वतीने सांस्कृतीक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, आपण या कार्यक्रमांस उपस्थित रहावे हेच आग्रहाचे निमंत्रण !
चारकोपचा सम्राट मित्र मंडळ, हे मुंबई उपनगरातील चारकोप विभागातील जुने व मानाचे मंडळ. मंडळाची स्थापना २००८ साली झाली. गेली समांतर १५ वर्षे अविरतपणे चारकोपचा सम्राट आदरणीय राजन भाई झाड यांच्या हस्त कौशल्याने आकार घेत आहे. मंडळ दरवर्षी गणारायांची मुर्ती विविध रूपात सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. गणारायचे ही महाकाय रूप पाहण्यास दरवर्षी संपूर्ण चारकोप गणेश भक्तांनी फुलून जाते, ‘न भूतो ना भविष्यती’ अशी तोबा गर्दी होते .
‘उत्सवातुन समाजसेवेकडे’ हे ब्रीदवाक्य कायम स्मरणाशी ठेवून उपरोक्त मंडळ सलग १५ वर्षे रक्तदान शिबीर, मोफत वैद्यकीय तसेच नेत्र तपासणी शिबीर, आदिवासी पाड्यावर जाऊन संगणक, प्रिंटर, इन्व्हर्टर तसेच शैक्षणिक साहित्य वाटप व मार्गदर्शन शिबीर अनेक समाजोपयोगी कामे अविरतपणे करत आहेत.
त्याचप्रमाणे उपरोक्त मंडळाने २०२४ मध्ये वृक्षरोपण अभियान, समुद्र किनारे स्वच्छता अभियान, आदिवासी समुदायांसाठी अस्तित्व सुरक्षित अभियान, महिला सक्षमीकरण आणि स्वयंसहाय्यता बचतगट योजना सारखे कार्यक्रम योजिले आहेत.
चारकोपचा सम्राट मंडळाने केलेल्या समाजोपयोगी कार्याची दखल घेत २०१६ मध्ये ‘माघी उत्सवाचा राजा’ २०२२ आणि २०२३ मध्ये ‘संस्कृती जतन प्रतिष्ठान पुरस्कृत लोकमान्य’ सन्मान देऊन गौरविण्यात आले ते फक्त देणगीदार, जाहिरातदार, हितचिंतक आणि कार्यकर्त्यांची प्रामाणिक मेहनत यांच्यामुळेच
कार्यक्रम रुपरेषा
१० फेब्रुवारी, २०२४
श्रीं चा आगमन सोहळा
१३ फेब्रुवारी, २०२४
श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना – सकाळी ८:०० वा.
१७ फेब्रुवारी, २०२४
श्री सत्यनारायण महापूजा – दुपारी ४:०० वा.
१९ फेब्रुवारी, २०२४
श्रीं ची विसर्जन मिरवणूक – दुपारी ४:०० वा.